Maharashtra Election Commission : SIR बाबत राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची माहिती; पात्र मतदाराचं नाव वगळणार नाही, एस. चोकलिंगम यांची ग्वाही

Maharashtra Election Commission : SIR बाबत राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची माहिती; पात्र मतदाराचं नाव वगळणार नाही, एस. चोकलिंगम यांची ग्वाही

मुंबई : राज्यात SIR प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून कमी केलं जाणार नाही, अशी माहिती आज, शुक्रवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच 2002 सालची मतदार यादी समोर ठेऊन मॅपिंग केलं जाणार असून त्यामध्ये आपलं किंवा आपल्या पालकांचं नाव जुळतंय का हे पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच 10 कोटी मतदारांच्या नोंदीची पडताळणी होणार असल्याचा निर्णय यावेळी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. राज्यातील SIR प्रक्रिया ही 29 जुलैपर्यंत सुरू राहणार असून मतदारांच्या घरी BLO प्रत्यक्ष भेट देऊन माहिती गोळा करणार आहेत. तसेच BLO घरी आल्यानंतर कुणी उपस्थित नसेल तर त्यांना 29 जुलैनंतरही त्यांचे नाव नोंदवता येणार असल्याची माहिती एक. चोकलिंगम यांनी यावेळी दिली. 

हेही वाच : Maharashtra Cow Smuggling Crackdown : गो-तस्करांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई होणार; मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश

लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीत दुबार मतदान झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तसेच मतदार यादीतून दुबार मतदार काढून नवी यादी तयारी करावी आणि निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी देखील विरोधकांनी केली होती. महत्त्वाचे म्हणजे ईव्हीएममध्ये हॅक होत असल्याचा दावा करत विरोधकांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची देखील मागणी केली होती. दरम्यान, आता राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version