उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारपासून सुरुवात

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारपासून सुरुवात

मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. २९ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज देता येणार आहे.

 

३० ऑक्टोबरला अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरला आहे, त्यानंतर राज्यातील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आठ दिवसांची मुदत असली तरी  शनिवार तसेच रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी अर्ज दाखल करता येत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात अर्ज भरण्यासाठी सहा दिवस मिळणार आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version