एसटी संपाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका

एसटी संपाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका

एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा सर्वाधिक फटका बसत असेल तो ग्रामीण भागातून मोठ्या गावात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थांना. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास ३० हजार पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी एसटी बसने प्रवास करत असतात. मात्र गेल्या महिना भरापासून बस बंद असल्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी झाली तर यात सर्वाधिक परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे.

कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी शाळा सुरु झाल्या आहे आणि एसटी कर्मचारी आपल्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. अनेक गावात फक्त प्राथमिक शिक्षणाची सोय असल्याने अनेक गावातून विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या गावात येत असतात, ही संख्या खूप मोठी आहे. नंदुरबार जिल्ह्यात ३० हजार विद्यार्थी शिक्षणासाठी बस प्रवासासाठी पास घेत असल्याची माहिती आहे. बस बंद असल्याने काही ठिकाणी पाच ते साह किलोमीटरची पायपीट विद्यार्थी करतात, तर काही ठिकाणी जीव धोक्यात घालून प्रवास केला जातो. मात्र आता विद्यार्थ्यांनी बस सुरु करावी अशी मागणी केली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी बंद असल्याचा जबर फटका बसत आहे. एसटी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना  काही ठिकाणी खासगी वाहनांचा वापर करत प्रवास करावा लागतो. आणि खासगी वाहनचालक प्रवाशांकडून कमी अंतराच्या प्रवासासाठी जास्तीचे पैसे घेतात. त्यामुळे प्रवास करण्यासाठी प्रवाशांसह विद्यार्थ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांकडून एसटी सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version