राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीच्या जागेवर माती सर्वेक्षणाचे काम सुरु होते. हे काम आता पूर्ण झाले आहे.
जमिनीचा भार सहन करण्याची क्षमता, जमिनीच्या आत वेगवेगळी खोली आणि पायाभरणीसाठी आवश्यक अभ्यास, जमीन विकासासाठी आवश्यक प्रयत्न, नागरी कामांमध्ये असलेल्या अडचणींची माहिती समजून घेण्यासाठी भूपृष्ठाच्या स्तराचे मूल्यांकन करताना माती सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा अपेक्षित परिणाम काय आहे, हे नमुने तपासल्यानंतरच व माहितीचे विश्लेषण केल्यानंतर समजेल. नमुने तपासल्यानंतर प्रवर्तक कंपन्या येथे प्रकल्पाच्या तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यतेचे मूल्यांकन करतील. अनुकूल परिणाम असल्यास पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तसेच केंद्र सरकार रिफायनरी कंपनी तसेच आरआरपीसीएल यांच्या सहमतीनंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास कायद्याप्रमाणे भूसंपादन प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.