लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक पोस्टर्ससुद्धा पाहायला मिळत आहे. यातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोसरीमध्ये राष्ट्रवादीच्याच नेत्याचे पोस्टर लागलेले पाहायला मिळत आहे. या पोस्टरमुळे आता चर्चांना उधान आलं आहे. अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार आहेत.मागच्या लोकसभा निवडणुकीत देखील माजी आमदार विलास लांडे शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. शिरूर लोकसभा मतदारसंघात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनर्सवर भावी खासदार असे लिहिण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून विलास लांडे यांची ओळख आहे. संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात लांडेंकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनर्सवर भावी खासदार लिहिण्यात आलं आहे आणि तसंच संसदेचा फोटोही पाहायला मिळतोय. मागच्या लोकसभा निवडणुकीत देखील माजी आमदार विलास लांडे शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. मागच्या वेळीही विलास लांडेनी मतदारसंघात मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं.
अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार आहेत. मध्यंतरी अमोल कोल्हे हे नाराज असल्याची चर्चा होत होती. अशातच आता राष्ट्रवादीचाच नेता त्यांच्या विरोधात दंड थोपटण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात विलास लांडे यांचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकं खासदारकीची उमेदवारी कुणाला देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात शिरूर लोकसभा मतदारसंघ आधीपासूनच चर्चेत आहे. अमोल कोल्हे नाराज असल्याचं बोललं जात असतानाच विलास लांडे यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे येत्या काळात काय घडामोडी घडतात हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.