शिवसेना, भाजपाचं शक्तीप्रदर्शन

शिवसेना, भाजपाचं शक्तीप्रदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. ठिकठिकाणी त्यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. दोन्ही नेते हेलिकॉप्टरने अयोध्येत आले. त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन देखील केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.अयोध्या नगरी आमच्यासाठी अत्यंत श्रद्धेचा, भावनेचा, भक्तीचा आणि अस्मितेचा विषय आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच येथे आलो आहे. त्यामुळे अत्यंत आनंद होत आहे, समाधान वाटत आहे. याठिकाणी हिंदुत्वाचे भगवे वातावरण दिसून येत आहे. यासाठी मी सर्व राम भक्तांचे आणि योगीजी आणि त्यांच्या मंत्र्यांचे तसेच आमच्या शिवसैनिकांचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले,

आपले हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि लाखो-करोडो राम भक्तांचे स्वप्न होते की, अयोध्येत भव्य दिव्य असे राम मंदिर बनावे. हे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरु आहे. ते लवकरच पूर्ण होणार आहे. सर्वांचे हे स्वप्न पूर्ण होत आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानतो. शिवसेना-भाजप युती राज्यात अत्यंत मजबुतपणे काम करत आहे, विकासाचे काम करत आहे. पूर्वी महाराष्ट्रात साधूंचे हत्याकांड झाले, तसे आमच्या राज्यात अजीबात होणार नाही. आमच्या राज्यात विकासाची कामे होती, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

विमान तळावर मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत

एकनाथ शिंदे यांचे लखनऊ विमानतळावर आगमन होताच त्यांचे ढोलताशांच्या गरजार स्वागत करण्यात आले.यावेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा हार आणि गदा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शिंदेंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर गेले आहे. शनिवारी सायंकाळी ते लखनऊमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

अयोध्येत मेगा रॅली

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अयोध्येत मेगा रॅली निघाली. या रोड शोला प्रचंड गर्दी होती. स्थानिक लोकही या दोन्ही नेत्यांना पाहण्यासाठी एकवटले होते. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात होत्या. तसेच अयोध्येत नाक्या नाक्यावर भगवे झेंडे लावण्यात आले होते. तसेच पोस्टर्स आणि बॅनरवाजी करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवमय झालं होतं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version