नवाझुद्दीनचा धक्कादायक खुलासा

नवाझुद्दीनचा धक्कादायक खुलासा

मुंबई, १५ जून २०२३ , प्रतिनिधी : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे तसेच आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान सध्या तो आगामी टिटू वेड्स शेरू या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच नुकताच नवाजुद्दीन सिद्दीकी याने अत्यंत मोठा खुलासा केला आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्या सुरुवातीच्या दिवसांतील आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्याने होइंडि सिनेसृष्टीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, ज्युनियर आर्टिस्ट असताना त्याच्या चेहऱ्यावर मेकअप आर्टिस्टने थेट पावडर फेकली होती. नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, मला आठवते की मी एका चित्रपटात ज्युनियर कलाकार होतो आणि माझ्यासारखे इतरही काही ज्युनियर कलाकार होते. त्यावेळी आम्हाला एका रांगेत उभे करून मेकअप आर्टिस्टने मेकअप म्हणून आमच्या चेहऱ्यावर पावडर फेकली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version