जे उडून गेले ते कावळेच… सोडून द्या पवारसाहेब – शिवसेना

जे उडून गेले ते कावळेच… सोडून द्या पवारसाहेब  – शिवसेना

जे सोडून गेले ते कावळे व आता उरलेल्या मावळ्यांच्या जोरावर पक्षबांधणी करू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला, पण जे कावळे उडाले, त्या कावळ्यांचा इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते? पवारसाहेब तुम्हीच होता. राष्ट्रवादीत पंधरा वर्षे राहून सत्तेचे दाणे, वैरण खाऊन या कावळ्यांचे मावळे होऊ शकले नाहीत. शरद पवारांना शिवसेनेने सामनातून लक्ष केले आहे.

काय आहे अग्रलेखात?

जे सोडून गेले ते कावळे व आता उरलेल्या मावळय़ांच्या जोरावर पक्षबांधणी करू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला, पण जे कावळे उडाले त्या कावळय़ांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते? पवारसाहेब तुम्हीच होता.

पंधरा वर्ष या कावळ्यांनी राष्ट्रवादीत काढले पण या सत्तेचे दाणे, चारा, वैरण खाऊन या कावळय़ांचे मावळे होऊ झाले नाहीत. असेच कावळे शिवसेनेतही होतो. पण ते गेले तरी ‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ या मंत्रावर शिवसेना उभी राहिली. बाळासाहेबांनी घडवलेले मावळे हे जमिनीवरच राहिले.

मोदी लाटेतही या मावळ्यांनी किल्ला लढवून व भगवा राखला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काही विचार, धोरण आणि दिशा उरली नाही. 370 कलम हटवले म्हणून साऱ्या देशात आनंदी आनंद असताना ‘370’च्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादीने उभे राहणे हे कसले धोरण? त्यामुळे काँग्रेस पक्षालाही गळतीच लागली.

2014 मध्ये निकालापूर्वी भाजपला सरकार बनविण्याचे आमंत्रण देणारे कावळे राष्ट्रवादीचेच होते. राष्ट्रवादीच्या कावळ्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण काही प्रमाणात वेगळ्या वळणावर दिसले.कावळेच ते, शेवटी कावळेच राहिले. महाराष्ट्रात ‘युती’ला जिथे गरज आहे, तिथे नव्या मावळ्यांचं स्वागत होईल. उडून जाणारे कावळे आम्हांला नकोत. ‘युती’चा फॉर्म्यूला ठरला आहे…. महाराष्ट्राचा विकास आणि जनतेचं कल्याण या एकमेव अजेंड्यावर सत्ता आणि जागांचं वाटप समान तत्त्वावर होईलच होईल. राज्य मावळ्यांचेच असेल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version