मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट, शिवसैनिकांकडून मुंडण आणि चोप

मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट, शिवसैनिकांकडून मुंडण आणि चोप

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री बनले. मात्र नव्या मुख्यमंत्र्यांविरोधात मत व्यक्त करणं चांगलंच महागात पडत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी ठाकरेंसंदर्भात मांडलेल्या मतांमुळे त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका झाली. तर उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीला शिवसैनिकांनी भर रस्त्यात बेदम माराहण केली. एवढंच नव्हे, तर त्याचं मुंडणही करण्यात आलं.

त्या शिवसैनिकांवर कारवाई होणार का?

शिवसेनेविरोधात मत मांडणाऱ्यांना धडा शिकवण्याची स्टाईल शिवसेना सत्तेत आल्यावरही थांबलेली नाही.

याउलट सरकारचाच पाठिंबा असल्याप्रमाणे शिवसैनिकांनी भर चौकात एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना मुंबईतील (Mumbai) वडाळा येथे घडली.

हिरामणी तिवारी असं मारहाण (Manhandled) झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

तिवारी बजरंग दल तसंच विश्व हिंदू परिषदेशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिवारीला शिवसैनिकांनी चोप दिला. तसंच त्याचं मुंडणही केलं.

या मारहाणीत त्याच्या कानाच्या पडद्याला दुखापत झाली असल्याचं सांगण्यात येतंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जामिया मिलिया येथील पोलिसी कारवाईची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. या विरोधात हिरामण तिवारी या व्यक्तीने पोस्ट केली होती. मात्र त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी तिवारी याला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडिया (Social Media) वर व्हायरल झालाय. अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version