Shivraj Patil: भारतीय संसदेत अमीट ठसा उमटवणारे शिवराज पाटील चाकूरकर काळाच्या पडद्याआड

संसद आधुनिकीकरण, मंत्रिपदावरील उल्लेखनीय कामगिरी आणि दीर्घ सेवेमुळे त्यांचा राष्ट्रीय स्तरावरील ठसा कायम स्मरणात राहणार आहे. राजकीय क्षेत्रात त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Shivraj Patil: भारतीय संसदेत अमीट ठसा उमटवणारे शिवराज पाटील चाकूरकर काळाच्या पडद्याआड

लातूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. लातूरमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपचार घेत होते. त्यांच्या जाण्याने राज्य आणि देशाच्या राजकीय क्षेत्रात दुःखाची लाट पसरली आहे.

शिवराज पाटील चाकूरकर हे अभ्यासू, संयमी आणि स्वच्छ प्रतिमा असलेले नेते म्हणून ओळखले जात. 12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे त्यांचा जन्म झाला. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी सार्वजनिक कार्यात प्रवेश केला आणि 1967 मध्ये लातूर नगरपालिकेपासून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. लोकसभेत पहिल्यांदा 1980 मध्ये निवडून आल्यापासून सलग सात वेळा त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन करत राष्ट्रीय पातळीवर वैयक्तिक छाप निर्माण केली.

हेही वाचा: Suryakumar Yadav On IND vs SA : कर्णधार सूर्यकुमारने सांगितली टीम इंडियाच्या पराभवाची कारणे; गिलबाबत दिले मोठे विधान! "आपण नेहमीच…"

इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणूऊर्जा आणि अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. 1991 ते 1996 या कालावधीत देशाचे लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी संसदेचे आधुनिकीकरण आणि कामकाजाचे थेट प्रसारण यांसारख्या ऐतिहासिक सुधारणांना प्राधान्य दिले. संसद कार्यपद्धतीत नवे मानदंड प्रस्थापित करणारे नेता म्हणून त्यांना विशेष मान मिळाला. 2004 मध्ये केंद्रातील गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली.

पुढे 2010 ते 2015 या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्याचे श्रेयही त्यांच्याच नावावर आहे. वैयक्तिक आयुष्यात ते अत्यंत साधे आणि तत्त्वनिष्ठ होते. त्यांच्या निधनाने एक खंबीर, अभ्यासू आणि विवेकी राजकीय व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. काँग्रे

ससह विविध पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत शोक व्यक्त केला आहे. देशाच्या संसदेत आणि प्रशासकीय व्यवस्थेत दीर्घकाळ मोलाची सेवा देणारे शिवराज पाटील चाकूरकर यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणातील एक सुवर्ण पान कायमचे पलटले असल्याची भावना सर्वत्र उमटत आहे.

हेही वाचा: Samruddhi Mahamarg Accident : देवदर्शनासाठी निघालेल्या यात्रेकरूंवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version