शिवभोजन योजनेला ‘या’ दिवसापासून प्रारंभ

शिवभोजन योजनेला ‘या’ दिवसापासून प्रारंभ

अवघ्या 10 रूपयांत अन्न पुरवणाऱ्या ‘शिवभोजन’ योजनेची अंमलबजावणी 26 जानेवारीपासून राज्यभरात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवभोजन योजनेचा आढावा घेऊन अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.

अखेर 26 जानेवारीपासून ‘शिवभोजन’ सुरू

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने 10 रूपयांत थाळी देण्याचं वचन दिलं होतं.

शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवभोजन थाळी योजनेचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

या योजनेत अनेक त्रुटी असल्याची तक्रार ही योजना सुरू होण्यापूर्वीपासूनच होऊ लागल्यामुळे जेव्हा प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू होईल, तेव्हा यातील खऱ्या समस्या समजतील.

राज्यातल्या गरीब जनतेला केवळ 10 रूपयांत शिवभोजन उपलब्ध होणार आहे.

यासाठी डिसेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत मंत्रीमंडळाने मान्यता दिली.

ही योजना प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे.

शिवभोजन थाळी योजनेसाठी सुरुवातीच्या 3 महिन्यांत 6 कोटी 48 लाख खर्च अपेक्षित आहे.

पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात किमान एक भोजनालय असेल. तसंच जास्तीत जास्त 500 थाळी सुरू करायला शासनानं मान्यता दिली आहे.

याला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना इतर भागात राबवण्यात येईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version