शिवसेनेची नवी रणनिती

शिवसेनेची नवी रणनिती

राज्यसभेच्या महाराष्ट्रतील सहा जागांसाठी होणारी निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी आज सकाळी मविआ नेत्यांच्या एक शिष्टमंडळाने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट  घेतली. यावेळी मविआने भाजपला एक प्रस्ताव दिला होता. पण भाजपने हा प्रस्तावाला नकार दिला आहे. मविआचा प्रस्ताव धुडकावल्याने भाजप आपला तिसरा उमेदवार मागे घेणार नाही हे स्पष्ट झाले आहे. हेच लक्षात घेऊन आता शिवसेनेकडून खास रणनिती आखण्यात येत आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. शिवसेना समर्थक सर्व अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ६ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता वर्षा निवास्थानी बैठकीचं निमंत्रण दिलं आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी येत्या १० जून रोजी विधान भवनात मतदान होणार आहे. त्यापूर्वी कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना ८ जून रोजी मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत येणाऱ्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना ट्रायडंट हाँटेलमध्ये रहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ८ जून ते १० जून अशी व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं बोलावलेल्या आमदार बैठकीत काय रणनिती आखणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version