शिवसैनिकावरील हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काल सुनावणी पार पडली. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून नितेश राणे अज्ञातवासात आहेत. त्यामुळे मुंबईतील गिरगावमध्ये शिवसेनेने बॅनरबाजी करण्यात आली.
गिरगावमधील भाजप कार्यालयाच्या शेजारी शिवसेनेने नितेश राणे यांचे बॅनर लावले. या बॅनरवर नितेश राणे यांचा फोटो असून ते हरवले आहेत तसेच नितेश राणेंची ओळख सांगणारी माहितीसुद्धा या बँनरवर लिहिण्यात आली आहे. त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीस एक कोंबडी बक्षिस म्हणून देण्यात येणार असल्याचेही त्यात लिहिण्यात आले आहे. या बॅनरमार्फत नितेश राणे यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली असून सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही. दरम्यान मागील तीन दिवसांपासून नितेश राणे अज्ञातवासात असून पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.