एकनाथ शिंदे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर पोहोचले आहेत. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांना एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी प्रथम अडवण्यात आले होते. त्यांनतर त्यांना हॉटेलात प्रवेश मिळाला. मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यांची बैठक २० मिनिटे चालू होती. परंतु त्यांची समजूत काढण्यात मिलिंद नार्वेकर निष्फळ ठरले. यांनतर एकनाथ शिंदे यांनी अशी अट घातली आहे की, ते थेट मुख्यमंत्रीशीच बोलणार आहेत.
याचदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेचे 35 आमदार असल्याची मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे. तसेच अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु गटनेतेपदी नियुक्ती करण्याच्या यादीवर फक्त २२ आमदारांची सही आहे.
एकनाथ शिंदे आज संध्याकाळी राजीनामा देण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.