‘शिंदे सरकार १५ ते २० दिवसात कोसळणार’

‘शिंदे सरकार १५ ते २० दिवसात कोसळणार’

जळगावातील जिल्ह्यातील पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, या सभेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर करोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत आगामी १५ दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

संजय राऊत म्हणाले की, “प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहे. आम्ही मात्र निकालाची वाट पाहत आहोत. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या ४० लोकांचे जे काही राज्य आहे, ते पुढील १५ ते २० दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही, असे राऊत म्हणाले. तसेच मी मागे देखील एकदा म्हटले होते की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही, या सरकारचा ‘डेथ वॉरंट’ निघालेले आहे. आता सही कोणी आणि कधी करायची हे ठरले “असल्याचे संजय राऊतांनी म्हटले.

उद्धव ठाकरेंची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडत आहे. मात्र सभेपूर्वीच राजकारण तापले असून गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शिंदे गटाने सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. तर संजय राऊत यांनी सरकार कोसळण्याचा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरेंची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडत आहे. मात्र सभेपूर्वीच राजकारण तापले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version