नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत अनेक मोठ्या नेत्यांची नावं समोर आली आहेत. अशोक खरात हा राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचा अध्यात्मिक मार्गदर्शक होता. अशातच आता शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
शितल म्हात्रे यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “क्रूरकर्मा खरात ला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्री च्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे…यही तो नही ‘ताज’ का राज ? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे… ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल…#खरात_फाइल्स”.
नेमकं काय आहे पाणीप्रकरण?
नाशिकमधील दारणा धरणातून अशोक खरात यांच्या शिवनिका संस्थेसाठी 39 लाख लिटर पाणी मंजूर करण्यात आले होते, ज्याचा जीआर (GR) नुकताच समोर आल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. या संस्थानला पाणी पुरवण्यासाठी धरणापासून 48 किलोमीटर लांब पाईपलाईन टाकण्यात आली होती. हे पाणी पिण्यासाठी आरक्षित दाखवले असले तरी, त्याचा वापर खरातच्या 21 एकरमधील आंब्याच्या बागेसाठी केला जात असल्याचा आरोप आहे. हा प्रस्ताव 25 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजूर झाला होता.
अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान आता अशोक खरातविरोधात 10 वा गुन्हा दाखल झाला आहे.
क्रूरकर्मा खरात ला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्री च्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे…
यही तो नही “ताज” का राज ? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे… ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल …#खरात_फाइल्स — sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 25, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.