Share Market Crash : गुरूवारी शेअर बाजारावर साडेसाती! शेवटच्या एका तासांत गुंतवणूकदारांचे बुडाले 7.30 लाख कोटी रूपये

1,236 अंकांनी घसरून 82,498.14  वर बंद झाला, तर निफ्टी 365 अंकांनी घसरून 25,500 वर बंद झाला.
Share Market Crash : गुरूवारी शेअर बाजारावर साडेसाती! शेवटच्या एका तासांत गुंतवणूकदारांचे बुडाले  7.30 लाख कोटी रूपये

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या भू-राजकीय तणावानंतर मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे आज, गुरुवार, 19 फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. व्यवहार बंद होताना, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली.सेन्सेक्स 1,236 अंकांनी घसरून 82,498.14  वर बंद झाला, तर निफ्टी 365 अंकांनी घसरून 25,500 वर बंद झाला.

कोणत्या शेअर्समध्ये अधिक घसरण? 
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये इंटरग्लोब एव्हिएशन, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, ट्रेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, अदानी पोर्ट्स, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, आयटीसी लिमिटेड, पॉवर ग्रिड यांचे शेअर्स लक्षणीयरीत्या घसरले.

लार्जकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण
लार्जकॅप गटात इंडिगो (3.23%), एम अँड एम (2.97%), ट्रेंट (2.89%), बीईएल (2.70%), अडाणी पोर्ट्स (2.50%), कोटक बँक (2.29%) आणि रिलायन्स (2.11%) या शेअर्समध्ये लक्षणीय घसरण झाली. मिडकॅप गटात हिंदुस्तान पेट्रोलियम (4.95%), पेटीएम (4.51%) आणि गोदरेज प्रॉपर्टीज (3.50%) या शेअर्समध्येही मोठी पडझड झाली.

गुंतवणुकदारांचे मोठं नुकसान
या घसरणीत, कंपन्यांचे मार्केट कॅप 47,174,876.86  कोटी रुपयांवरून 4,64,43,943.53 कोटी रुपयांवर घसरले, म्हणजेच गुंतवणूकदारांना 7.30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांवरही दबाव आला, बीएसई मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांक अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरले. या घसरणीचा गुंतवणूकदारांच्या संपत्तीवरही मोठा परिणाम झाला. सत्रादरम्यान बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल झपाट्याने घसरले, ज्यामुळे बाजार मूल्यात हजारो कोटींचे नुकसान झाले.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version