‘शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवले’

‘शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवले’

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या सुरु असलेल्या घडामोडींमुळे संपूर्ण राज्यभर खळबळ माजली आहे. दरम्यान, शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवले आहे. दादा गटाची कारवाई केली असून ही कारवाई ३० जूनलाच करण्यात आली आहे, असे वक्तव्य दादा गटाचे नेते उमेश पाटील यांनी केले.

शरद पवार यांचं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’च्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशच्या वेळी पुस्ताचे प्रकाशन झाल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त करत राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनी निर्णय जाहीर केल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आणि निर्णयाला विरोध करण्यात आला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन शरद पवारांना हटवत अजित पवार यांनी स्वत: अध्यक्ष असल्याचं पत्र निवडणूक आयोगाला सोपवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन शरद पवारांना हटवत अजित पवार यांनी निवड केल्याच्या आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केल्याचं या पत्र निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण राष्ट्रवादीवर दावा करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version