Sharad Pawar on Sunetra Pawar :सुनेत्रा पवार थेट मुंबईकडे रवाना, शपथविधीबाबत शरद पवार अनभिज्ञ; दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या आशा धुसर

अशातच आता शरद पवार यांनी या सगळ्यावर भाष्य केले आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी मोठे खुलासे केले आहेत. 
Sharad Pawar on Sunetra Pawar :सुनेत्रा पवार थेट मुंबईकडे रवाना, शपथविधीबाबत शरद पवार अनभिज्ञ; दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या आशा धुसर

राज्यभरात सध्या उपमुख्यमंत्री पदावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अजित दादांनंतर उपमुख्यमंत्रीपदासाठी आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव समोर आले आहे. आज सायंकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र यावरून आता पवार कुटुंबीयांमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता शरद पवार यांनी या सगळ्यावर भाष्य केले आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी मोठे खुलासे केले आहेत. 

ते म्हणाले की, अजित पवार कर्तृत्ववान नेते होते . अशी कर्तृत्ववान व्यक्ती सोबत नसणं, सोडून हा महाराष्ट्रावर सर्वात मोठा आघात आहे. कुटुंबावरही हा आघात आहे. NCPने काय करावं हे त्यांनी ठरवलं, मी त्यावर भाष्य करणार नाही. तटकरे, प्रफुल्ल पटेल पक्षाचे प्रमुख, तो त्यांचा अधिकार आहे. सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा नाही. त्यांच्या शपथविधीची मला माहितीच नाही. 

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणारबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  अजित पवार आणि जयंत पाटील यांची विलीनीकरणाबाबात चर्चा झाली होती. विलीनीकरणाबाबत चर्चा होती, पण आता खंड पडला आहे. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version