‘राज्यात जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न’

‘राज्यात जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न’

बारामती, ८ जून,२०२३, प्रतिनिधी :

‘राज्यात जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे’, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ‘जनतेनं शांतता राखावी, पोलिसांना सहकार्य करा’, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे. कोल्हापुरात घडलेल्या हिंसाचारावर शरद पवार यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

“कोल्हापूरमध्ये जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकतेला शोभणारं नाही” “महाराष्ट्र हे शांतताप्रिय राज्य आहे, इथल्या लोकांची कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती नाही”, असे शरद पवार यावेळी म्हणाले. “कुणीतरी काहीतरी करुन, जाणीवपूर्वक वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्यालाही माझा आक्षेप आहे”. “याची किंमत सामान्य माणसाला मोजावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी हे घडणार नाही याची काळजी घ्या. शासकीय यंत्रणेला सर्वसामान्य लोकांनी मनापासून सहकार्य करण्याची गरज आहे.” असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर मंगळवारी या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या होत्या. औरंगजेबाचा संदर्भ देऊन काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. त्यांनी बुधवारी (दि. ७ जून) कोल्हापूर बंदची हाक दिली. त्यानंतर प्रचंड मोठा मोर्चा काढला. जमावबंदीचे आदेश झुगारून हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा सुरू असतानाच आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी अखेर या मोर्चावर लाठीमार केला.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version