मधुकर पिचड काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झाले आहे.
मधुकर पिचड काळाच्या पडद्याआड

नाशिक : ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नाशिक येथे पिचड यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून उपचार सुरू होते. त्यांना ब्रेनस्ट्रोक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.  

मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबर रोजी राजूर येथे त्यांच्या घरी ब्रेनस्ट्रोकचा झटका आला होता. नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात मधुकरराव पिचड यांच्या उपचार सुरू होते. वयोमानामुळे उपचाराला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांचे निधन झाले. मधुकरराव पिचड यांची मोठी राजकीय वाटचाल होती. अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव आहे.

 

 

मधुकर काशिनाथ पिचड, माजी मंत्री

जन्मतारीख – ०१ जून १९४१

जात – महादेव कोळी

गाव – राजुर, अहिल्यानगर, वडील शिक्षक होते.

शिक्षण – पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बी ए एल एल बीचे शिक्षण. तिथूनच विद्यार्थी राजकारणाला सुरुवात

राजकीय प्रवास –

–    अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून १९७२ ला निवड

–    १९७२ ते १९८० पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड

–    १९८० पासून २००९ पर्यन्त सलग ७ वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले

–    १९९५ ते जुलै १९९९ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली होती.

–    राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही पिचड यांनी धुरा सांभाळली होती

–    मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिलाय.

–    राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते, २०१४ ला अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले

–    २०१९ ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला.

–    मधुकर पिचड यांनी १९६१ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली

–    मधुकर पिचड यांनी १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला

–    आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडलीये

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version