दीड वर्षांनंतर नवाब मलिक घरी परतले

दीड वर्षांनंतर नवाब मलिक घरी परतले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक दीड वर्षांनंतर घरी परतले आहेत. ईडीने नवाब मलिक यांच्या जामिनाला विरोध केला होता. पण तब्येतीच्या कारणाची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना दोन महिन्यांचा जामीन दिला आहे. हा हंगामी जामीन आहे. जामिनावर असताना नवाब मलिक यांना काही अटींचे पालन करावे लागेल.

नवाब मलिक हे फेब्रुवारी २०२२ पासून तुरुंगात होते. ते वारंवार जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांचा अर्ज फेटाळला जात होता. अखेर सर्वोच्च न्यायालयात तब्येतीचे कारण देत नवाब मलिक यांनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. हा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला. जामिनाशी संबंधित तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर नवाब मलिक तुरुंगाबाहेर आले आहेत.

आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीने कारवाई सुरू केली आहे. मुंबईत १९९३ मध्ये १३ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या व्यक्तीची मालमत्ता खरेदी करून आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे.

नवाब मलिक यांना जामीन मिळाल्याचे जाहीर होताच अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांच्या गटाने जल्लोष केला. यामुळे जामिनावर बाहेर आल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटासोबत असतील हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

नवाब मलिक यांची सुटका
नवाब मलिक रुग्णालयातून बाहेर
क्रिटी केअर रुग्णालयात होते मलिक
दीड वर्षांनंतर मलिकांची सुटका

नवाब मलिकांवर काय आहेत आरोप ?

मलिकांनी गोवावाला कंपाउंडमधील ३ एकर जमीन बेकायदेशीरपणे हडपली

मुनीरा प्लंबर या महिलेची ती जमीन होती.

मलिकांसोबत या कटात हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान सामील

सरदार खान 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी

मुनीराने 1999 मध्ये सलीमच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी केली.

सलीमने पारकरच्या सूचनेनुसार ती जमीन मलिकांच्या कंपनीला विकली

मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर दिली

भाड्यातून आलेल्या पैशातून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version