SBI बँकेने बचत खात्यावरील व्याज दर कमी केले आहेत. हे नवीन व्याज दर लवकरच लागू होणार आहेत. एसबीआय बचत खात्यात 1 लाख रुपये जमा ठेवणाऱ्या ग्राहकांना 3.50 % व्याज देत आहे. परंतु 1 नोव्हेंबरपासून हे व्याज दर 3.25 % होणार आहे. त्याप्रमाणे SBI बँकेने MCLR चे दर 0.10 टक्क्यांनी घटवले आहेत.
RBI ने 4 ऑक्टोबर रोजी 0.25 % व्याजदर घटवल्याची घोषणा केली होती.
त्याचप्रमाणे रेपो रेट 0.25 % घटवून 5.15 टक्क्यांवर आणले आहेत.
SBIने रिटेल डिपॉझिटवर 0.10 % आणि बल्क डिपॉझिटवर 0.30 % दर घटवले आहेत.
बँकेने सर्व कालावधीसाठी MCLR दरात 0.10 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला.
हा निर्णय 10 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
त्याचप्रमाणे भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना मोठी भेट दिली आहे.
गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त केले आहे.
एसबीआयने कर्जावरील MCLR दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बँकेने केलेली चालू आर्थिक वर्षातील ही सहावी कपात आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्याच आठवड्यात रेपो दरात कपात केली.
आता पुढील आर्थिक वर्षापर्यंत हे दर 8.15 टक्क्यांवरून 8.05 टक्क्यांवर येऊन स्थिरावले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.