राष्ट्रवादी मधून गेलेल्यांना मिळालेल्या खात्याबद्दल ते लोक समाधानी आहेत का बघावे लागेल, असे म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोमणा लगावला आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
१९ आमदारांचं आमच्याकडे बळ होतं, मात्र त्यातले काही आमदार दोन्हीकडे हो म्हणणारे आहेत. पण आमदारांना त्यांच्या मनाप्रमाणे वागून दिलं पाहिजे. ज्यांना जिथे जायचंय त्यांना तिथे राहू दिले पाहिजे असे जयंत पाटील माध्यमाशी बोलत असताना म्हणाले. मला अजित पवार गटामधून ऑफर असल्याच्या चर्चेवर देखील जयंत पाटील यांनी या केवळ चर्चा असून मी शरद पवारांसोबतच राहणार आणि शरद पवार सांगतील ते धोरण ठरवणार असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. आगामी पावसाळी अधिवेशनात राज्यातील अनेक प्रश्न जे आ वासून उभे आहेत ते आम्ही मांडू असेही जयंत पाटील म्हणालेत.. तसेच आता काँग्रेसकडे।जास्त आमदाराची संख्या असल्याने राष्ट्रवादी आता विरोधी पक्ष नेत्यांवर।दावा करणार नसून काँग्रेसने लवकर विरोधी पक्ष नेता निवडावा असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.