Sanjay Raut On Sachin Ahir : "आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?" अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडताच राऊतांची पहिली प्रतिक्रिया

ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उपसभापतीपदासाठी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Raut On Sachin Ahir : "आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?" अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडताच राऊतांची पहिली प्रतिक्रिया

ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उपसभापतीपदासाठी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. नुकतीच शिंदेंनी चालवलेल्या मोठ्या चालीमुळे ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ऑपरेशन टायगरमधील 6 खासदारांनंतर एकनाथ शिंदे यांनी अवघ्या 8 दिवसांत ठाकरेंना हा मोठा धक्का दिला.

विधान परिषदेचे आमदार सचिन आहिर फुटले असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधान परिषदेतील उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शिंदेसेनेकडून सचिन अहिर यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर शिवसेना ठाकरे गटातील नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांच लक्ष लागलेलं होत अशातच संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत मनातील खदखद व्यक्त केली आहे. "आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?" असे म्हणत, "पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा कीडा घेऊन येतात, त्यांच्या जाण्याचे दुःख का करावे," असा टोला त्यांनी लगावला आहे. 

हेही वाचा- Sanjay Shirsat : ठाकरेंचे उरलेले 5 आमदारही शिंदेसेनेच्या वाटेवर? शिरसाटांनी केला मोठा गौप्यस्फोट; राजकीय खळबळ

पुढील 2 वर्षाकरिता उपसभापती पद अहिर यांच्याकडे
सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांना आज सकाळी संपर्क साधून पक्ष सोडणार संदर्भात माहिती दिली होती. सचिन अहिर यांनी भारतीय कामगार सेना आणि बेस्ट कर्मचारी सेनेच्या पदावरून राजीनामा दिला आहे. गेल्या 3 दिवसांपासून सचिन आहेर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. वैयक्तिक राजकीय भूमिका ही घेतली आहे असा मत सचिन अहिर यांनी दिली आहे. पुढील 2 वर्षाकरिता उपसभापती पद हे सचिन अहिर यांच्याकडे असणार आहे.

ठाकरे गटाचे विधान परिषदेत उरलेले 5 आमदार
1. अनिल परब 
2. मिलिंद नार्वेकर
3. अंबादास दानवे 
4. ज. मो. अभ्यंकर 
5. सुनील शिंदे 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version