राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना चार खासदार मुंबई विमानतळावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विमानतळावर त्यांना सुरक्षा व्यवस्थेच्या कडेकोट बंदोबस्तात बाहेर काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, विरोधकांनी या घटनेवरून गंभीर आरोप करत संबंधित खासदारांवर मतदारांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर आणि राजकीय सभांमधून पैशांच्या मोबदल्यात निष्ठा बदलल्याचा दावा केला जात असून, त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
अलीकडील राजकीय चर्चांमध्ये काही खासदारांना पक्षांतरासाठी मोठ्या आर्थिक ऑफर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांनी काही खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 50 कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्याचा दावा केला होता. अशातच आता सोशल मिडियावर संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी या पोस्टमध्ये संबंधित लोकप्रतिनिधींना गद्दार असे संबोधले आहे. त्यांच्या राजकीय निर्णयांचा इतिहास भविष्यातील पिढ्या कसा पाहतील याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, “50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले आणि भेदरलेल्या नजरेने सशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले, ये जिना भी क्या जिना है लल्लू? चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे! ह्यांची पुढील पिढी सांगेल, मेरा बाप गद्दार था, मेरा पती गद्दार था, मेरा नाना गद्दार था! जय महाराष्ट्र!”
संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर आज दुपारी 1.30 वाजता विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झाले. यानंतर आपल्या खाजगी वाहनाने ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचा मुंबईतील निवासस्थान नंदनवनच्या दिशेने निघाले आहेत.
50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले
आणि भेदरलेल्या नजरेने
शशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले
ये जिना भी क्या जिना है लल्लू?
चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे!
ह्यांची पुढील पिढी सांगेल
मेरा बाप गद्दार था
मेरा पती गद्दार था
मेरा नाना… — Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.