Sanjay Raut: ‘महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची मोडतोड करण्याचा डाव’; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

राऊत यांनी पुढे दावा केला की, सरकारला लोकसभेच्या जागा मनाप्रमाणे वाढवता आल्या नाहीत. तसेच संविधानाची ताकद आणि स्वतःची खरी राजकीय क्षमता सत्ताधाऱ्यांना आता समजली आहे.
Sanjay Raut: ‘महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची मोडतोड करण्याचा डाव’; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई: महिला आरक्षण विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महिला आरक्षण विधेयक हे एक राजकीय षडयंत्र होते आणि ते संसदेत कोसळल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची मनमानी पद्धतीने फेररचना करून सर्व निवडणुका जिंकण्याचा सरकारचा डाव होता. मात्र संसदेत हा प्रयत्न फसला असून, हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाच्या घसरणीची सुरुवात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राऊत यांनी पुढे दावा केला की, सरकारला लोकसभेच्या जागा मनाप्रमाणे वाढवता आल्या नाहीत. तसेच संविधानाची ताकद आणि स्वतःची खरी राजकीय क्षमता सत्ताधाऱ्यांना आता समजली आहे. सध्याचे सरकार केवळ 16 खासदारांच्या बहुमतावर टिकून असल्याचे सांगत, हे 16 खासदार कमी झाले तर मोदींना सत्तेतून बाहेर पडावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा: Road Accident News: घाटात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; पर्यटकांची व्हॅन दरीत कोसळून 10 जणांचा जागीच मृत्यू

त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये राहुल गांधी यांचाही उल्लेख केला. राहुल गांधी यांनी “16 चा फास” टाकला असून, पुढील काळात त्याचे परिणाम दिसतील, असा दावा राऊत यांनी केला आहे. “थांबा आणि वाट पाहा” असे म्हणत त्यांनी आगामी राजकीय घडामोडींविषयी सूचक इशाराही दिला.

महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, संजय राऊत यांच्या या पोस्टची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात या मुद्द्यावरून विरोधक आणखी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: Varsha Gaikwad: ‘सरकारचा उद्देश शुद्ध नाही’; महिला आरक्षण विधेयकावरून वर्षा गायकवाड यांची केंद्र सरकारवर टीका

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version