मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित लढणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होत्या. जागावाटपावरून हि युती होणार कि नाही याबद्दल मोठा पेच निर्माण झाला होता. अशातच आता संजय राऊत यांनी युतीबद्दल महत्त्वाचे संकेत दिले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो पोस्ट करत, “उद्या १२ वाजता”, असं लिहिलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठं वादळ आलं आहे. तसेच आता राज आणि मनसे एकत्रित निवडणूक लढवत असल्याने एक वेगळेच चित्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निर्माण झालं आहे.
या संभाव्य युतीमध्ये जागावाटपाचा तिढा प्रामुख्याने मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यांमध्ये अडकला होता. शिवडी, दादर, माहीम, भांडुप आणि विक्रोळी या मतदारसंघांतील जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरू होती. राज ठाकरे यांनी सामंजस्याची भूमिका घेत कार्यकर्त्यांना ‘जास्त न ताणण्याच्या’ सूचना दिल्या होत्या.
परिणामी, सोमवार संध्याकाळपर्यंत शिवडीतील तीनपैकी दोन जागा ठाकरेंच्या शिवसेनेला आणि एक जागा मनसेला देण्यावर एकमत झाले. तसेच दादरमधील प्रभाग क्रमांक 192 आणि 194 चा पेचही चर्चेतून सोडवण्यात आला आहे. मात्र, भांडुप आणि विक्रोळीमधील काही जागांवर अद्यापही खलबतं सुरू आहेत.
ठाकरे बंधूंच्या या नव्या समीकरणाची घोषणा एका मोठ्या शक्तिप्रदर्शनाद्वारे होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या प्रचंड उत्साह असून, संयुक्त मेळावा किंवा रॅलीच्या माध्यमातून हे शक्तिप्रदर्शन केले जाऊ शकते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हातात असलेला अत्यल्प वेळ पाहता, युतीची अधिकृत घोषणा आणि एबी फॉर्मचे वाटप या प्रक्रियेत दोन्ही नेत्यांची मोठी कसोटी लागणार आहे.
उद्या
१२ वाजता pic.twitter.com/ob47tQxhGG — Sanjay Raut (@rautsanjay61) December 23, 2025
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.