Sanjay Raut on Gautam Adani : संजय राऊतांची गाडी अदानींवर घसरली, म्हणाले, ‘पवारांचा पक्ष फोडण्यात…’

अदानींचे स्वागत करण्यासाठी स्वतः रोहित पवार यांनी गाडी चालवली. तर, त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. संपूर्ण पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर अदानींसोबत दिसल्याने..
Sanjay Raut on Gautam Adani : संजय राऊतांची गाडी अदानींवर घसरली, म्हणाले, ‘पवारांचा पक्ष फोडण्यात…’

Sanjay Raut on Gautam Adani and Ajit Pawar : बारामतीमध्ये आज गौतम अदानी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने वादळ निर्माण झाले आहे. या दौऱ्यात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याचे पाहायला मिळाले, ज्यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.

बारामतीतील विलक्षण दृश्य
गौतम अदानी यांच्या हस्ते बारामतीमध्ये ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय’ (AI) चे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, अदानींचे स्वागत करण्यासाठी स्वतः रोहित पवार यांनी गाडी चालवली. तर, त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून संपूर्ण पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर अदानींसोबत दिसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मुंबई ताब्यात घेण्याचा 'हव्यास'
संजय राऊत यांनी या दौऱ्याबाबत माध्यमांशी बोलताना अदानींवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "आमची लढाई ही अदानींच्या मुंबई गिळण्याच्या वृत्तीच्या विरोधात आहे. एका उद्योगपतीला मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने केंद्रातून उत्तेजन दिले जात आहे, ते मराठी माणसासाठी आणि मुंबईसाठी अत्यंत घातक आहे." कोणत्याही उद्योगपतीने मुंबईबाबत असा हव्यास दाखवला नव्हता, अशा शब्दांत त्यांनी भाजप आणि अदानींच्या मैत्रीवर निशाणा साधला.

हेही वाचा – Bandu Aandekar: बेड्या घातलेल्या हातांनी अर्ज भरला, पण फॉर्म वरील रकाने रिकामेच राहिले; आंदेकरचा 'पॉवर शो' प्रशासनाने रोखला? वाचा सविस्तर

पक्षांतरामागील अदानी कनेक्शनचा दावा
अजित पवारांच्या बंडाबाबत राऊतांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, "शरद पवारांचा पक्ष फोडण्यामागे आणि अजित पवारांना बाहेर काढण्यामागे गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता, अशी माहिती मी वाचली आणि ऐकली आहे. आता यातलं खरं-खोटं तेच सांगू शकतील." पवार कुटुंबाने अदानींना कार्यक्रमाला बोलवणे हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न असला, तरी ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्यासोबतच अदानींना पाहून राऊतांनी शंका उपस्थित केली आहे.

कौटुंबिक संबंध की राजकीय तडजोड?
शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध हे राजकीय नसून वैयक्तिक आणि कौटुंबिक असल्याचे राऊतांनी मान्य केले. मात्र, पक्ष फोडणारे अजित पवार आणि ज्यांच्यावर मुंबई लुटल्याचा आरोप होतोय असे अदानी एकाच ठिकाणी जमल्याने हा केवळ व्यक्तिगत प्रश्न उरत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. अदानींच्या माध्यमातून भाजप मुंबईवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा एकदा केला.

हेही वाचा – Thackeray Alliance: माहीम ते वरळी… 67 प्रभागांत भाजप-शिंदे गटाची धाकधूक वाढली; काय आहे ठाकरेंच्या युतीचं गणित?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version