Sanjay Nirupam : शिवसेनेमध्ये मराठी सक्तीवरून दोन गट; सरनाईकांच्या निर्णयाला निरुपमांचा विरोध

प्रताप सरनाईकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला शिवसेना पक्षातील नेते संजय निरुपम यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध दिसत आहेत. त्यामुळे पक्षातच दोन गट निर्माण झाले आहे. एका गटाचा या निर्णयाला जाहीर पाठिंबा आ
Sanjay Nirupam : शिवसेनेमध्ये मराठी सक्तीवरून दोन गट; सरनाईकांच्या निर्णयाला निरुपमांचा विरोध

राज्याचे परिवहन मंत्री आणि एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू मानले जाणार प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार १ मे पासून संपूर्ण राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यात प्रामुख्याने मुंबई आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यात परप्रांतीय लोकं मोठ्या प्रमाणावर राहतात. रिक्षा आणि टॅक्सी चालवणे यांचे मुख्यतः उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात रोष वाढत चालला आहे.

शिवसेनेतूनच निर्णयाला वाढता विरोध

प्रताप सरनाईकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला शिवसेना पक्षातील नेते संजय निरुपम यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध दिसत आहेत. त्यामुळे पक्षातच दोन गट निर्माण झाले आहे. एका गटाचा या निर्णयाला जाहीर पाठिंबा आहे तर संजय निरुपम यांचा गट निर्णयाला कडाडून विरोध करत आहे. मुळतः उत्तर भारतीय असलेल्या निरुपम यांना उत्तर प्रदेशमधील मुंबईत राहणाऱ्या अनेक परप्रातीयांचा मोठा पाठिंबा आहे.

नक्की पक्षात घडतंय तरी काय?

मराठी सक्तीला वाढता विरोध आणि उत्तर भारतीय नेत्यांचा वाढता रोष त्यामुळे शिवसेनेत एक वेगळा गट सरनाईकांवर नाराज झाला आहे. संजय निरुपम पक्षाचे मोठे नेते आणि मुंबईत खासदार राहिलेले आहेत. त्यामुळे मराठी सक्तीवरून ते नाराज असल्याचे दिसून येईल आहेत. सक्ती करू नये, यासाठी निरुपम पुढाकार घेताना दिसून येत आहेत.

संजय निरुपम यांचे सरनाईकांना पत्र 

'मराठी सक्ती करू नये', भाषेबाबत एवढा कठोर निर्णय घेऊ नये, असं पत्र शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवलं आहे. त्या पत्रामध्ये निरुपम यांनी भाषेचा आधारे, किती वाईट परिणाम आपल्या पक्षावर होऊ शकतो, याबाबतची माहिती पत्रामध्ये नमूद केली आहे.

एकनाथ शिंदे काय तोडगा काढणार? 

पक्षात मराठी सक्तीवरून दोन गट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. शिंदे प्रताप सरनाईक यांना समजावणार की निरुपम यांना शांत करणार, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version