Sandeep Deshpande on White Line Controversy: घाटकोपरपाठोपाठ दादारमध्येही पांढरी पट्टी, मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक

मुंबईतील दादर पच्छिममधील डीएस बाबरेकर मार्गावर पांढरे पट्टे मारल्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पांढऱ्या पट्ट्यांवरुन आक्षेप घेतला आहे. 
Sandeep Deshpande on White Line Controversy: घाटकोपरपाठोपाठ दादारमध्येही पांढरी पट्टी, मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक

मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार परिसरातील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनासाठी रस्त्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी रंगवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अशातच आता  मुंबईतील दादर पच्छिममधील डीएस बाबरेकर मार्गावर पांढरे पट्टे मारल्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पांढऱ्या पट्ट्यांवरुन आक्षेप घेतला आहे. 

आज दुपारी 3 वाजेपर्यंत दादरमधील पांढरे पट्टे हटवण्यात यावे. अन्यथा आम्ही पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारु, असा इशारा संदीप देशपांडेंनी दिला.  बाबरेकर मार्गावर असलेल्या जैन मंदिराच्या बाजूच्या लेनमध्ये हा पट्टा मारण्यात आला आहे. लेनच्या सुरुवातीपासून ते गोकुळ धामच्या इमारतीपर्यंत हा पट्टा मारण्यात आला आहे. संदीप देशपांडे यांच्या या इशाऱ्यानंतर महापालिकेकडून तात्काळ रस्त्यांवरील पांढरे पट्टे हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version