Bihar CM Samrat Chaudhary Oath : बिहारमध्ये भाजपचे ‘सम्राट’ पर्व! 24 व्या मुख्यमंत्रीपदी सम्राट चौधरी विराजमान; शपथविधी संपन्न

बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठा बदल मानला जात आहे.
Bihar CM Samrat Chaudhary Oath : बिहारमध्ये भाजपचे ‘सम्राट’ पर्व! 24 व्या मुख्यमंत्रीपदी सम्राट चौधरी विराजमान; शपथविधी संपन्न

भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी बुधवारी बिहारच्या 24व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे मानले जात आहे. राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी पटण्यातील लोकभवन येथे सम्राट चौधरी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 

सम्राट चौधरी यांच्यासोबत जनता दल युनायटेडचे विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. हे दोघे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रमुख नेते, आमदार आणि माजी मुख्यमंत्री नितीश कुमार हेही या शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. 

नितीश कुमार यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत त्यांचे मंत्रिमंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर सम्राट चौधरी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. सम्राट चौधरी याआधी बिहारचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारीही होती. 

हेही वाचा: Raju Shetti : एक किलोमीटरला 254 कोटी?; राजू शेट्टींचा थेट सवाल, शक्तीपीठ महामार्गाच्या खर्चावरून सरकारवर डागली तोफ

सम्राट चौधरी यांचा जन्म 1968 मध्ये झाला. ते एका प्रभावशाली राजकीय कुटुंबातून आले आहेत. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे तारापूर मतदारसंघातून सहा वेळा आमदार राहिले होते, तर त्यांच्या आई पार्वती देवी यांनीही याच मतदारसंघातून विजय मिळवला होता. सम्राट चौधरी यांनी 1990 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड आणि अखेर 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 

सम्राट चौधरी यांच्या मुख्यमंत्रीपदाला बिहारच्या जातीय राजकारणातही महत्त्व आहे. ते कोयरी समाजातील मुख्यमंत्री होणारे दुसरे नेते ठरले आहेत. याआधी 1968 मध्ये सतीश प्रसाद सिंह यांनी अल्पकाळ मुख्यमंत्रीपद भूषवले होते. सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये भाजपचे स्थान आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

हेही वाचा: Aaditya Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेत ऐतिहासिक बदलांची नांदी! आदित्य ठाकरे होणार पक्षाचे कार्याध्यक्ष? 2003 च्या इतिहासाची पुनरावृत्ती

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version