Saalumarada Thimmakka Passed Away : पद्मश्री पर्यावरणवादी सालुमरदा थिम्मक्का यांचे 114 व्या वर्षी निधन

त्यांनी 4.5 किमी रस्त्यावर 385 वडांची झाडे लावून त्यांचे संगोपन केले. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना खऱ्या अर्थाने ‘वृक्षमाता’ म्हटले.
Saalumarada Thimmakka Passed Away : पद्मश्री पर्यावरणवादी सालुमरदा थिम्मक्का यांचे 114 व्या वर्षी निधन

बेंगळुरू : पर्यावरण संवर्धनासाठी आयुष्यभर निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या आणि पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या ‘साळूमरदा तिम्मक्क' यांचे शुक्रवारी एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या 114 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या अस्वस्थ होत्या आणि उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 30 जून 1911 रोजी जन्मलेल्या तिम्मक्का यांनी आपल्या अथक परिश्रम आणि वृक्षारोपण मोहिमेमुळे ‘साळूमरदा’ (सलग रांगेतील झाडांची आई) ही उपाधी मिळवली. रमणगरामधील हुलीकल ते कुदूर या 4.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर त्यांनी 385 वडाचे वृक्ष लावले आणि त्यांचे संगोपन स्वतःची मुले समजून केले.

संतानहीन आयुष्यातील रिकामेपणा दूर करण्यासाठी त्यांनी ही हरित मोहिम हाती घेतली होती. औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांनी केलेले कार्य केवळ प्रेरणादायीच नव्हे तर जागतिक स्तरावर कौतुकास्पद ठरले. त्यांच्या हिरव्या क्रांतीसाठी त्यांना 2019 मध्ये पद्मश्री, 2010 मध्ये हम्पी विद्यापीठाचा नाडोजा पुरस्कार, 1995 मध्ये नॅशनल सिटिझन अवॉर्ड आणि 1997 मध्ये इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार यांसह अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा: Bihar Assembly Election 2025: अनेक निवडणुकांत महिला ठरतायेत ‘किंगमेकर’; ज्यांना करतील मतदान तेच स्थापन करतायेत सत्ता

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत X वर लिहिले, “वृक्षमाता साळूमरदा तिम्मक्का यांच्या निधनाची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले. त्यांनी हजारो झाडे लावली, त्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम दिले आणि आयुष्यभर पर्यावरण संवर्धनासाठी वाहिले. त्यांच्या जाण्याने राज्याचे नुकसान झाले आहे, परंतु निसर्गासाठीचे त्यांचे प्रेम त्यांना अमर करून गेले.”

ते पुढे म्हणाले, “त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या कुटुंबियांस माझ्या संवेदना.” पर्यावरण संवर्धनाला आयुष्य समर्पित करणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाला देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

हेही वाचा: IAF Plane Crash in Chennai: चेन्नईत भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले; पायलट थोडक्यात बचावला

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version