रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ

रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ

रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. रशिया-युक्रेनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे या युद्धाचा परीणाम सराफा बाजारावर पाहायला मिळाला. या युद्धामुळे जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम सोन्याच्या दरवाढीत झाल्याचे दिसत आहे. जळगावच्या सराफा बाजारात जीएसटीसह सोन्याचे दर ५३ हजार ५०० इतके झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोने खरेदी करण्याची घाई न करण्याचे आवाहन सराफा बाजाराने केले आहे. तसेच ग्राहकांच्या मते, सोन्याच्या दरात झालेली सोन्याची दरवाढ सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे सर्वसामान्यांना ही सोन्याची दरवाढ परवडणारी नसल्याची प्रतिक्रिया ग्राहकांन दिली आहे.

युक्रेनचे रशियाला ‘जशास तसं उत्तर’

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला युक्रेनेनही रशियाला प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धपरिस्थितीमध्ये युक्रेन लष्कराने मोठा दावा केला आहे. रशियाची सहा विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनमधील लुहान्स्क प्रांतामध्ये ही विमाने पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे.यामध्ये १०० रशियन सैनिक ठार झाले असल्याचेही युक्रेन लष्कराने म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version