युक्रेनभोवती रशियाचा वेढा कडक

युक्रेनभोवती रशियाचा वेढा कडक

रशिया-युक्रेन देशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र लढाई सुरू आहे. रशियाने युक्रेनच्या नागरी वस्तीवर लक्ष्य केले असून क्षेपणास्त्र हल्ला, बॉम्बहल्ला करत आहे. त्यामुळे या युद्धात युक्रेनच्या अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनभोवती वेढा कडक केला असून युक्रेनची सर्व बाजूंनी नाकाबंदी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे युक्रेनची मदतीसाठी धावाधाव होत आहे.

रशियाच्या ब्लॅक सी फ्लीटने समुद्रातून युक्रेनच्या लष्करावर क्षेपणास्त्र डागली आहेत. युक्रेनमधील सेवास्टोपोल या भागात कॅलिबर-एनके या क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. मात्र, युक्रेन माघार घेण्यास तयार नाही. तसेच काही युरोपीय देशसुद्धा युक्रेनसोबत सहानुभूती दाखवत आहेत. परिणामी रशियाने युक्रेनभोवती आपली नाकेबंदी घट्ट केली आहे. आता इथून पुढे युद्ध परमोच्च बिंदू गाठणार आहे, असा अंदाज अभ्यासकांकडून वर्तवण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version