युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाचा हल्ला

युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाचा हल्ला

रशिया-युक्रेन युद्धाचा आज नववा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव कायम असून रशिया युक्रेनवर तीव्र लढाई करत आहे. आज पहाटे रशियाच्या लष्करी सैन्याने युक्रेनच्या एनरहोदर शहरातील वीज केंद्रावर हल्ला केला. झापोरीझिया अणुऊर्ज प्रकल्पावर रशियाने हल्ला केला असून या हल्ल्यामुळे अणू प्रकल्पाला भीषण आग लागली.

झापोरीझिया अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रवक्ते एँड्री तुज यांनी सांगितले की, प्रकल्पाचे नुतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे ते कार्यरत नव्हते. मात्र, प्रकल्पात परमाणु इंधन आहे. तसेच या प्रकल्पाला आग लागल्यामुळे हल्ला थांबवण्याचे आवाहन युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमो कुलेबा यांनी केले आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘रशियाचे लष्करी सैन्य सातत्याने या प्रकल्पावर गोळीबार करत आहेत. या प्रकल्पाला आग लागली असून यावेळी स्फोट झाला तर तो चोरनोबिलपेक्षा १० पट मोठा असले. त्यामुळे रशियन सैन्याने हल्ला थांबवावा.’

रशिया-युक्रेन देशांमध्ये शांततेसाठी चर्चा सुरू आहे. रशिया-युक्रेनमध्ये दोन वेळा चर्चा करण्यात आली. मात्र अद्याप युद्धावर तोडगा निघालेला नाही. तर रशियाची तीव्र चढाई युक्रेनवर सुरूच आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version