रोहित पवारांना एसआरपीएफ केंद्रात जाण्यासाठी मज्जाव

अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्राचं लोकार्पण करण्यासाठी आलेल्या आमदार रोहित पवार यांची पोलिसांशी धक्काबुक्की झाली.
रोहित पवारांना एसआरपीएफ केंद्रात जाण्यासाठी मज्जाव

अहमदनगर : अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्राचं लोकार्पण करण्यासाठी राशपचे आमदार रोहित पवार यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री अनिल परब त्या ठिकाणी उपस्थितीत होते. पोलिसांनी आत जाण्यास रोहित पवार यांना अडवले. त्यानंतर आत जाण्यासाठी रोहित पवार आणि कार्यकर्ते आग्रही असल्याचे दिसून आले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या घोषणा दिल्या. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version