‘आधी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्या’

‘आधी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्या’

राज्यातील १६ आमदार अपात्रेचं प्रकरण माझ्या हातात येईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले होते. यावर, उद्धव गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला आहे. राहुल नार्वेकरांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्या, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

राहुल नार्वेकर यांनी आधी पदाचा राजीनामा द्यावा. ज्यांनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला आहे. त्यांना निर्णय घेऊ द्या. नरहरी झिरवळ यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडेच हे प्रकरण गेलं पाहिजे. त्यांचा निर्णय दुसरा अध्यक्ष फिरवू शकत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

तसेच, राहुल नार्वेकर यांची कायदा मंत्र्यासोबत बैठक पार पडली. त्यामुळे कायदा मंत्र्यांनी बंद दरवाजाआडच्या बैठकीत काय सांगितलं का? तुमच्याकडेच प्रकरण येईल हे तुम्हाला कसं पाहित? ही कोणती दादागिरी आहे? कायदा मंत्री तीन तास बंद दाराआड चर्चा करताय हे काय चाललंय? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version