Mahapalika Mayor Aarakshan : महापौरपद आरक्षण सोडत जाहीर; अनुसूचित जमातीसाठी एक, जातीसाठी 3 तर ओबीसीसाठी 8 प्रवर्गांसाठी जाहीर

Mahapalika Mayor Aarakshan : महापौरपद आरक्षण सोडत जाहीर; अनुसूचित जमातीसाठी एक, जातीसाठी 3 तर ओबीसीसाठी 8 प्रवर्गांसाठी जाहीर

मुंबई : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. यात अनुसूचित जमातीसाठी एक, अनुसूचित जातीसाठी 3, ओबीसीसाठी 8 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 महापालिकांची सोडत जाहीर झाली आहे. 

हेही वाचा : Sanjay Raut : “हे ढोंग उघड पडलंय…त्यांची विश्वासार्हता संपली” मनसेचा शिंदेंना पाठिंबा; कल्याणमधील प्रकारावरुन राऊत संतापले

कोणत्या प्रवर्गासाठी किती आरक्षण – 

अनुसूचित जमाती – 1  
कल्याण डोंबिवली महापालिका

अनुसूचित जाती – 3 
ठाणे महापालिका
जालना महापालिका (महिला)
लातूर महापालिका (महिला)

ओबीसी – 8 
पनवेल महापालिका
इंचलकरंजी महापालिका
उल्हासनगर महापालिका
कोल्हापूर महापालिका
चंद्रपूर महापालिका (महिला)
जळगाव महापालिका (महिला)
अकोला महापालिका (महिला) 
अहिल्यानगर महापालिका (महिला) 

सर्वसाधारण – 17 
मुंबई – सर्वसाधारण (महिला)
पुणे – सर्वसाधारण (महिला)
नाशिक – सर्वसाधारण (महिला)
नवी मुंबई – सर्वसाधारण (महिला)
नांदेड-वाघाळा – सर्वसाधारण (महिला)
मालेगाव – सर्वसाधारण (महिला)
धुळे – सर्वसाधारण (महिला)
मीरा-भाईंदर – सर्वसाधारण (महिला)
नागपूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण
भिवंडी-निजामपूर – सर्वसाधारण
पिंपरी-चिंचवड – सर्वसाधारण 
वसई-विरार – सर्वसाधारण
छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण
सांगली-मिरज-कुपवाड – सर्वसाधारण
सोलापूर – सर्वसाधारण
परभणी – सर्वसाधारण

महाराष्ट्रात महापौरपदाचे वाटप –

एसटी प्रवर्ग : 7 टक्के (02)
एससी प्रवर्ग : 11.5 टक्के (03) 
ओबीसी : 27 टक्के (09)
सर्वसाधारण व ओबीसी महिला : 50 टक्के (15)

आरक्षण काढताना रोटेशन पद्धत वापरली गेली.

2017-22 दरम्यान महापालिकेत जे आरक्षण होते ते वगळून चिठ्या काढण्यात आल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version