राज्यात १०० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला मान्यता

राज्यात १०० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला मान्यता

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यात शाळेत १०० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे. राज्यांतील अनेक शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे मुंबई महानगर पालिकेने शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली असून आजपासून मुंबईतील शाळा, महाविद्यालये पूर्ण क्षमतेने ऑफलाईन पद्धतीने झाले आहेत. यासंबंधी मुंबईपालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मुंबई पालिकेकडून सादर करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमाच्या, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा, मैदानी खेळ आणि शैक्षणिक उपक्रमांसह पूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या २ मार्चपासून मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात याव्यात.

आजपासून मुंबईतील सर्व शिक्षण मंडळाच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता शाळांमध्ये पूर्णवेळ विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळणार आहे. २०२०मध्ये राज्यातील शाळांमधील प्रत्यक्ष शिक्षण बंद होऊन ऑनलाईन माध्यमातून वर्ग सुरु झाले. परंतु आता कोरोनापूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांमध्ये उपक्रम सुरु होणार आहे शाळांमधील उपस्थितीही शंभर टक्के करण्यात आली आहे. म्हणजे सर्व विध्यार्थ्यांना एकाच वेळी शाळेत बोलवण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळा बंद झाल्यापासून एकदाही शाळा पूर्ण वेळ सुरु करण्यास परवानगी नव्हती परंतु आज बुधवारपासून शाळा पूर्ण वेळ भरणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version