नवी दिल्ली: चिनी स्मार्टफोन निर्माता रियलमी (Realme) ने भारतात आणखी एक परवडणाऱ्या किंमतीतील स्मार्टफोन Realme C83 5G लॉन्च केला आहे. कंपनीच्या C Series मधील हा फोन कमी बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स देणारा असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 7000mAh क्षमतेची मोठी बॅटरी, मिलिटरी ग्रेड शॉक रेसिस्टन्स आणि वॉटर रेसिस्टंट (IP64 Rating) सारखी टिकाऊपणाची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच या सेगमेंटमध्ये 144Hz Refresh Rate असलेला डिस्प्ले देणारा हा सर्वात परवडणाऱ्या किमतीतील फोन असल्यामुळे तो ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरत आहे.
किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, Realme C83 5G तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 4GB RAM + 64GB Storage असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. 4GB RAM + 128GB Storage व्हेरिएंट 14,499 रुपये किमतीत उपलब्ध आहे, तर 6GB RAM + 128GB Storage असलेला टॉप व्हेरिएंट 17,499 रुपये दरात विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. या स्मार्टफोनची पहिली विक्री 7 मार्च रोजी दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तसेच कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर सुरू होणार आहे. ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर सहा महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देण्यात आला आहे.
Realme C83 5G मध्ये 7000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली असून त्यासोबत 15W USB Type-C Charging सपोर्ट दिला आहे. याशिवाय फोनमध्ये 5W Reverse Wired Charging फीचर देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे आवश्यकतेनुसार इतर डिव्हाइस चार्ज करण्यासाठीही या फोनचा वापर करता येतो. परफॉर्मन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये मेडिया Dimensity 6300 Processor देण्यात आला आहे, जो दैनंदिन वापरासह गेमिंगसाठीही चांगली कार्यक्षमता देतो.
स्टोरेजच्या बाबतीत या फोनमध्ये 6GB RAM आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेजचा पर्याय मिळतो. तसेच MicroSD Card च्या मदतीने स्टोरेज 2TB पर्यंत वाढवण्याची सुविधा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा LCD Display देण्यात आला असून तो 144Hz Refresh Rate ला सपोर्ट करतो. त्यामुळे स्क्रोलिंग, व्हिडिओ पाहणे किंवा गेमिंग करताना अधिक स्मूथ अनुभव मिळतो. याशिवाय फोनमध्ये Vapor Chamber Cooling System देण्यात आले आहे, ज्यामुळे दीर्घकाळ वापरातही फोन जास्त गरम होत नाही.
कॅमेरा फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास Realme C83 5G च्या मागील बाजूला 13MP AI Camera देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP Front Camera उपलब्ध आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत हा स्मार्टफोन Android 16 आधारित Realme UI 7.0 वर कार्यरत आहे. तसेच हा फोन फ्लेम ग्रीन आणि फ्लेम ब्लु या दोन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.
मोठी बॅटरी, उच्च रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, मजबूत डिझाइन आणि परवडणारी किंमत या वैशिष्ट्यांमुळे बजेट सेगमेंटमधील हा स्मार्टफोन विशेषतः तरुण वापरकर्त्यांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.