‘कर्मचाऱ्यांसोबत चर्चेस तयार’ – सुप्रिया सुळे

‘कर्मचाऱ्यांसोबत चर्चेस तयार’ – सुप्रिया सुळे

संपकारी एसटी कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास्थानी धडकले आहेत. यावेळी संपकारी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तर निवासस्थानाच्या आवारात कर्मचाऱ्यांकडून दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रसच्या खासदार सुप्रिया सुळे दाखल झाल्या असून त्यांनी संतप्त संपकारी कर्मचाऱ्यांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच माझ्या घरवरचा हल्ला हा दुर्देवी असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी, सुप्रिया सुळे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची तयारी दर्शवली आहे. तसेच हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा पर्याय त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर ठेवला आहे. माझी आई आणि मुलगी घरात आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करू द्या. मी हात जोडून सर्वांना विनंती करते की, माझी आणि आमच्या नेत्यांची चर्चेला तयारी आहे. शांततेच्या मार्गाने आम्ही एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

‘सिल्वर ओक’वर संपकारी कर्मचारी धडकले

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी अमान्य केल्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आज संपकारी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीच काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवसास्थानी धडक मोर्चा काढला आहे. यावेळी संपकारी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या विरोधात घोषणा केली. या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. न्यायालयाचा निर्णय मान्य नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. यावेळी कर्मचाऱ्याकंडून चप्पल आणि दगडफेकसुद्धा करण्यात आली. दरम्यान, एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version