राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी दुपारपर्यंतची मुदत आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मविआने तिसरा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली मात्र भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप तिसरा उमेदवार मागे घेणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे मविआच्या आशा पूर्णपणे धुळीस मिळाल्या. शिवसेनेचे संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यातील लढतीमुळे आता राज्यसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार नाही या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर पेच निर्माण झाला त्यामुळे या वक्तव्यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्या आपण पाहुयात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.