मुंबई, २३ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडमध्ये अलीकडच्या काळात बऱ्याच कलाकारांच्या मुलांनी पदार्पण केले. अशातच आता अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे ती मधल्या काळात बरीच चर्चेत होती. दरम्यान आता ती पुन्हा एकदा चर्चेत अली आहे. नुकताच राशाने तिच्या समाज माध्यमांवर सामायिक केला आहे. हे पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.
जागतिक संगीत दिनानिमित्त, अभिनेत्री रविना टंडन हिची मुलगी राशाने तिच्या एका परफॉर्मन्सचा एक व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर सामायिक केला होता. यात ती हॉलिवूड गायिका एमी वाइनहाऊसचे ‘व्हॅलेरी’ गाणे गाताना दिसत आहे. यात रेषाचा आवाज ऐक्यन नेटकरी मी,आता मंत्रमुग्ध झाले आहेत.
राशा व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘तुझा आवाज थेरपीसारखा आहे’. दुसर्या युजरने लिहिले, ‘व्वा, मला आश्चर्य वाटले, किती मस्त आवाज आहे’. तर तिसर्याने ‘तू खूप टॅलेंटेड आहेस’ असे लिहिले.राशाने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही क्षणातच यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी यावर कंमेंट्स केल्या आहेत.
राशा थडानीने नुकतेच मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर लवकरच राशा अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूर या नव्या जोडीला लाँच करणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.