बारसु परिसरातील कातळशिल्पांची देशातील नामांकित संशोधक व अभ्यासक यांच्या समवेत खासदार विनायक राऊत हे मंगळवारी (दि.१३ जून) पाहणी करणार आहेत. बारसुच्या सड्यावर असलेले कातळशिल्प हा आता राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय महत्वाचा विषय झाला आहे.
राजापूर तालुक्यातील बारसु ते देवाचे गोठणे येथील सड्यावर पसरलेली कातळशिल्प संरक्षित करावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे. येथील पंचक्रोशीतील सर्वच ग्रामसभानी तसे ठरावही केले आहेत. यातील काही कातळशिल्प युनेस्को च्या जागतिक वारसास्थळ घोषित होण्याच्या मार्गावर आहेत. हाच जागतिक वारसा संरक्षित करण्यासाठी येथे रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित होऊ नये ही मागणी जोर धरू लागली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.