भारतीय उद्योजक रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात यावे, यासाठी सोशल मिडियावर एक मोहिम सुरू होती. यावर रतन टाटा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चाहत्यांना ही मोहिम थांबवण्याचे आवाहन केले. यासंदर्भात त्यांनी टि्वट करून त्याच्या भावना मांडल्या आहे. ‘मला भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा, यासाठी सोशल मिडियावरील काही जणांकडून मोहिम राबवण्यात येत आहे. त्यांच्या भावनांचा मला आदर आहे. मात्र, ही मोहिम थांबवावी. मी स्वत: ला भाग्यवान समजतो की मी भारतीय आहे. तसेच भारताच्या प्रगती आणि समृद्धीसाठी प्रयत्नशील आहे’, असं टि्वट त्यांनी केलं. ‘भारतरत्न’साठी सुरू असलेली मोहिम थांबवण्याचं आवाहन करुन असंख्य लोकांचं मन टाटांनी पुन्हा एकदा जिंकलं आहे.
मोटिवेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम रतन टाटा यांना भारत रत्न देण्याची मागणी केली होती. यानंतर बघता-बघता अनेकांनी टि्वट करत या मागणीला समर्थन दिलं. Ratan Tata आणि BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग ट्रेंड सुरु झाला होता. रत टाटा यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासाठी मोठ्या प्रमाणात दान केले आहे. शिवाय कोरोनाच्या काळात देशाला देशाला 1500 कोटींची मोठी रक्कम दिली. सध्या रतन टाटा 83 वर्षांचे आहे. टि्वटरवर त्यांचे 93 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. रतन टाटा हे सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. त्यांचे इंस्टाग्रामवरही त्यांचे 3.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. टि्वटरवर त्यांनी आपल्या जीवनाशी संबंधित अनेक अनुभव शेअर केले आहेत. भारतीय उद्योजक जगात त्यांचं फार मोठ असून रतन टाटा यांच्या मदत करण्याच्या भावनामुळे त्यांनी जगाला जिंकलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.