राणा दाम्पत्याची घरीच प्रार्थना

राणा दाम्पत्याची घरीच प्रार्थना

राज्यात जेव्हापासून मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून महाराष्ट्राला ग्रहण लागले आहे. त्यामुळे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री या निवासस्थानी आज हनुमान चालीसा पठण करणार असल्याची भूमिका राणा दाम्पत्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले असून राणा यांच्या खार येथील घराला चहू बाजूंनी शिवसैनिकांनी घेराव घातला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना सकाळी ९ वाजता मातोश्रीवर पोहचता आले नाही. दरम्यान, राणा दाम्पत्यांनी घरीच प्रार्थना करण्यास सुरूवात केली.

राणा दाम्पत्य मुंबईत आल्यानंतर शिवसैनकांनी त्यांचा पाठलाग सोडलेला नाही. शनिवारी सकाळपासून शिवसैनिक राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिक जमले आहेत. तर त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली. आक्रमक शिवसैनिकांनी घराबाहेरच भजनाला सुरूवात केली. हातात टाळ, मृदूंग घेत शिसैनिकांनी भजनाला सुरूवात केली. दरम्यान, ९ वाजून गेले तरी घराबाहेर शिवसैनिकांच्या पहाऱ्यामुळे त्यांना मातोश्रीवर पोहचता आले नाही. त्यामुळे राणा दाप्त्यांनी घरीच पूजा-अर्चा केली. तसेच आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची प्रतिक्रिया राणा दाम्पत्यांनी दिली आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, आज नऊ वाजता मातोश्रीवर जाणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी आम्ही निघणार होतो. मात्र, पोलीस आमच्या दारातच उभे आहेत. आम्ही जिथे राहत आहोत, तिथे दुसरे कुटुंबियसुद्धा राहत आहेत. पोलीस इथे आल्यामुळे या सर्व कुटुंबीयांना त्रास होत आहे. त्यामुळे कोणाच्या आदेशामुळे पोलीस येथे आले आहेत, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version