गेल्या काही महिन्यांपासून भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत आली आहे. अशातच तिने नीट प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतरवर पार पडलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. तिने जंतरमंतरवरील आंदोलकांना गटर जनरेशन म्हणून संबोधलं होत. त्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीकांची झोड उडवली. अशातच आता कंगना रणौत विरुद्ध रामदेव बाबा हा नवा वाद समोर आला आहे.
जेन झी वर केलेल्या वक्तव्यावर रामदेव बाबांनी कंगना राणावतचं शिक्षण आणि तिची पात्रता काढली होती. त्यानंतर आता कंगना रणौतने योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ‘जेन झी’ पिढीबद्दल कंगनाने केलेल्या एका वादग्रस्त विधानावर रामदेव बाबांनी तिची शाळा घेत टीका केली होती, ज्याला उत्तर देताना कंगनाने “माझी जवानी किंवा बेडरूमची स्वप्ने पाहू नका” असे तिखट शब्दांत सुनावले आहे.
कंगना रणौतने पोस्ट करून रामदेव बाबांना खोचक टोला लगावला आहे. यावेळी ती म्हणाली की, “बाबाजी, तुम्ही माझी जवानी वा बेडरूमबाबतची स्वप्ने पाहू नका. कोणीही केवळ अफवा आणि गॉसिपच्या आधारेच अंदाज लावू शकतो. कमीत कमी मला खोट्या किंवा फ्रॉड मेडिकल दाव्यांवर कोर्टाने झापलेलं नाही. हे वास्तवावर आधारीत आहे. गॉसिपवर नाही. त्यामुळे मला कॅरेक्टरचं ज्ञान पाजळू नका. तुमच्या पेक्षा कितीतरी पटीने माझं कॅरेक्टर चांगलं आहे. माझा कोणताही फ्रॉड समोर आलेला नाही, असा हल्लाच कंगनाने चढवला आहे.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.