Bhaskar Jadhav on Ramdas Kadam: रामदास कदमांविरोधात भास्कर जाधवांची बोचरी टीका; कदमांना म्हणाले, ‘बामदास कदम…’

दसरा मेळाव्यानंतर रामदास कदम यांच्या वक्तव्यांवरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. माजी मंत्री भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत शिंदे गट व भाजपवर टीका केली आणि रामदास कदमांवर टिका केली आहे.
Bhaskar Jadhav on Ramdas Kadam: रामदास कदमांविरोधात भास्कर जाधवांची बोचरी टीका; कदमांना म्हणाले, ‘बामदास कदम…’

काल दसरा मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील काही प्रसंग उलगडले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून त्यावर आज माजी मंत्री भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली.
 
भास्कर जाधव म्हणाले, “शिंदे गटाकडे कोणतेही विचार नाहीत आणि त्यांच्या टिकेला गांभीर्याने घेण्यासारखे काहीही नाही. ज्यांच्या टिकेला समाजात स्थान नाही, विचारधारा नाही, अशा लोकांच्या वक्तव्याला आम्ही किंमत देत नाही. जे शिवसेना का सोडली हे सांगू शकले नाहीत, तेच आता मांडीला मांडी लावून बसले आहेत.”
 
एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायचे, फोटो लावायचे आणि दुसरीकडे शिवसेनेचा मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या असे म्हणायचे, हा विरोधाभास आहे. भाजपाला पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय बोलताच येत नाही आणि आता शिंदेंचीही तीच अवस्था झाली आहे.”
 
रामदास कदमांवर बोचरी टीका करताना जाधव म्हणाले, “सावली बारमध्ये बायका नाचल्याने त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कदम वेडे झाले असून मी त्यांना ‘बामदास कदम’ म्हणतो. 2009 साली ते माझ्याकडून पराभूत झाले होते, त्यानंतर उद्धवसाहेबांनी त्यांना आमदार पद दिलं, हेही ते विसरले आहेत.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version