Ramdas Kadam : खासदार फुटीवरून रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, ‘ठाकरे गटात फक्त तिघेच…’

Ramdas Kadam : खासदार फुटीवरून रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, ‘ठाकरे गटात फक्त तिघेच…’

मुंबई : ठाकरे गटाच्या सहा बंडखोर खासदारांनी बुधवारी नवी दिल्लीतील लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या कार्यालयात जाऊन स्वतंत्र गटाची नोंदणी केल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा अध्यक्षांनी या सहा बंडखोरांच्या गटाला मंजुरी दिल्याचेही समजते. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊत आणि भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ही वेळ का आली, याबाबत उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं. आता उद्धवजी, वहिनी आणि आदित्य ठाकरे तिघेच पक्षात राहणार, असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे. तसेच भास्कर जाधव तरी पक्षात राहतील का?, त्यांनी शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान रामदास कदमांनी दिले.

हेही वाचा : PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दोन दिवसांत जमा होणार पीएम किसानचा 23 वा हप्ता; जाणून घ्या बँका सुरू राहणार की बंद?

तुमचे आमदार, खासदार, नेते, कार्यकर्ते तुम्हाला का सोडून जात आहेत. याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे रामदास कदम यावेळी म्हणाले. तसेच संजय राऊत यांना उद्देशून, तुम्ही जे अपशब्द वापरले, आज महाराष्ट्र तुमच्यासाठी अपशब्द वापरत आहे. तुमच्या पायाखालची वाळू सरकलीए, त्यामुळे अशी बेछूट वक्तव्य करत आहात, असा टोला त्यांना लगावला. चाळीस आमदारांच्या जीवावर संजय राऊत खासदार झाले. नैतिकता असेल तर राजीनामा का दिला नाही? जगा सांगे ब्रह्मज्ञान…म्हणत संजय राऊत यांच्यावर टीका केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version